top of page
Bakul Flowers Image.jpg
© Bakul Raut
Abstract Fluid Forms

आई गं

मला नेहमीच आईने समझून घेतलं
मी आई ला कधी समझूच शकलो नाही.

आयुष्यात दिला जिने मला श्वास 
चेहऱ्यावर कधीच नसे माझ्यामुळे तिला त्रास.


सकाळी खाऊ, नंतर जेऊ,

खेळल्यानंतर अजून काही नवीन 
माझे सगळे हट्ट तिने पुरवले,

आणि जेवलो नाही तर हातानी भारावले.

एवढासा होतो मी जेव्हा आई पहिल्यांदा दिसली 
तेव्हा काळात नसेल कदाचित,

पण डोळ्यांनी पहिल्यांदा तिलाच बघितले असेल. 

नंतर हि आई असते, पण कधी दिसत नसते

कारण ती आई असते, नेहमीच पाठीशी असते

मग कशी ती लक्षात येईल.

आई आपल्या आयुष्यात काय असते,

कदाचित कुणालाच कळत नसावे 
कारण आईलाच वाटत नसेल,

तसे आपल्याला भासवावे.

बिन पगारी, फूल अधिकारी,

कधी हि हाक मारा, कधी हि तिच्यावर रागवा 
आपली हक्काची आई

नेहमीच हजर असते. 

पण आपली नजर कधी कशी तिच्यावर पडत नाही 
कारण... ती आई असते, नेहमीच पाठीशी असते. 

आई आपली ठीकच असते, तिला कधीच काही होत नाही 
तक्रार कधी तिने करायचीच नाही, कारण,
तो हक्क तिने आपल्यालाच दिला असतो.

लहानाचा मोठा कधी झालो हे कळलेच नाही
पण तिला हे नक्कीच कळले असावे.

लहानपणीचे बरेच काही विसरलो असेन
फक्त एक गोष्ट अजूनही विसरलो नाही 
काही पण वेदना असेल तर "आई गं" 
अजूनही तोंडातून जात नाही.

आज आई डोळ्यासमोर नाही, पण माहित आहे
ती पाठीशी आजही आहे.

आज आई जेव्हा नाही तर,

चुकल्यावर भीती अजूनही तिची वाटते 
आज ओरडायला आई नाही,

पण मनातून कुठली चूक करावीशी वाटतच नाही.

आज आई तुला सगळ्या चुकांसाठी माफी मागतो 
आणि पुढच्या जन्मी तुलाच "आई गं" बोलेन ह्याची वाट बघतो.

हि कविता माझ्या आई साठी आणि जगातल्या सगळ्या आईंसाठी.

00:00 / 02:00
Feel free to share:
© Bakul Raut
Comments
Share Your ThoughtsBe the first to write a comment.
Listen to the poem as a song:
bottom of page