

शैला मावशीचा ७५वा वाढदिवस
विषय तसा कठीण नाही
हि तर माझी दुसरी आई
बोलण्या सारखे खूप काही
पण मला काही सुचत नाही.
असे सहसा होत तर नाही
मनात आहे तर बरंच काही
आज शब्द नेमके सुचत नाहीत
ओठावर आहेत, पण व्यक्त होत नाहीत.
मग विचार केला, हा विचार सोडतो
जे मनात येईल, थेट तेच बोलतो
हे बघ, आज तू मात्र रडू नको
मोठ्यांनी हसायला कमी पडू नको.
आज आहे तुझी पंचात्तरी
सह परिवार हि आनंदाची वारी
आमच्या साठी तू विठू माऊली
पडू दे आम्हावर अशीच तुझी सावली.
तुझ्या कडे नात्यांची कधीच कमी नव्हती
आपुलकीने सर्वच नेहमी अवती भवती
हीच आयुष्याची कमाई, हेच साठवलेले धन
स्वच्च, सुंदर, नितळ, असे तुझे मन.
घट्ट तुझ्या नात्यांची आहे अशी वीण
आधार देणारी बायको, धीर देणारी बहीण
आम्हा कोणाची मावशी, आत्या तू कोणाची
आजी पण आहेस, पण आई तू सर्वांची.
तुझ्या कालवणाची चव, जिभेतुन जाई ना
तळलेल्या कोलंबीची आठवण, आल्याशिवाय राही ना
ती तू आग्रहाने पुन्हा दिलेली मच्छीची तुकडी
नको बोललो तरी त्यात कोलंबीची जोडी
काय सांगू तुझ्या जेवणाची गोष्ट वेगळीच काही
एखाद्याचे पोट भरेल, पण मन कधी नाही.
आयुष्य तुझे उदंड असो
तुझा जगभरचा प्रवास असाच अखंड असो
आज तुझ्या जन्मदिनी, इचछा ही आमच्या मनी
असेच साजरा करू, शंभरीची पण सेरेमोनी.
बकुल
२६ एप्रिल २०२६
