top of page
Bakul Flowers Image.jpg
© Bakul Raut
Abstract Fluid Forms

आई सांग ना

आई आई सांग ना रे तुला
आठवण येत असेल का गं माझी
दूर आकाशातल्या ढगांतून
माझ्यावर, नजर असेल ना गं तूझी.
 
मला नेहमी वाटते, तू वरून बघतेस
नेहमी माझ्या बरोबर, आई तू असतेस
विचारांना माझ्या, जरी हे पटत नाही
डोळे मिटून हाक मारता, तू कशी दिसतेस.

​

कित्ति वर्ष झाली आहेत गं आई
ए आई, अशी तुला हाक मारून
असे कित्ति क्षण गेले आहेत
तुझ्या विना साजरा करून.

​

आई, आज एकांतात, मन तुझी वाट पाहे
तुझी आठवण, सोबत डोळ्यात पाणी आहे
तुझ्या सारखी मला ही, तुझी पण काळजी आहे
जवळ नाहीस जरी तू, पण आठवण नेहमी साथ राहे.

​

ए आई. 

​

तुझा लाडका
मी.

Listen to the poem as a song:
Feel free to share:
© Bakul Raut
Comments
Share Your ThoughtsBe the first to write a comment.
00:00 / 02:00
bottom of page