top of page

© Bakul Raut

लग्नाचा ५०वा वाढदिवस
तो हि असाच होता शनिवार
तेव्हा हि असेल असेच एकत्र परिवार.
साल होते एकोणीसशे शहात्तर
महिना फेब्रुवारी चा
आणि तारीख होती सात.
तुम्ही दोघे त्याच दिवशी
अडकलात एक गोड़
नात्याच्या बंधनात.
पन्नास वर्ष प्रेमानी
सौंसार जमवला जोमानी
सर्वाना हे काही जमत नाही
पण तुमची सर्वांमध्ये गिनतीच नाही.
तुम्ही दोघे आमच्या साठी
खूप खूप खास आहात
देव दिसला नाही तरी
देवाचा आभास आहात.
धीर लागला तेव्हा होतात
आधार लागला तेव्हा होतात
सुखात पण तुम्ही होतात
दुःखात हि तुम्ही होतात.
ऐक सेंट्रल आणि एक स्टेट
कर्तव्याच्या मध्यात साठवली
तुम्ही आठवणींची व नात्यांची इस्टेट.
बघता बघता वर्षे झाली पानास
तरी तसाच आजही तुमचा सहवास
अशीच तुमची जोडी असो
जीवनात अशीच गोडी असो.
येवो अशेच हर साल आणि शनिवार
आणि असाच राहो आनंदी हा परिवार.

00:00 / 02:00
Feel free to share:
© Bakul Raut
Comments
Share Your ThoughtsBe the first to write a comment.
Listen to the poem as a song:
bottom of page