top of page

© Bakul Raut

मराठी दिवस
दिवस माय भाषेचा
गर्व माय मराठी चा
अ आ इ नि सुरु होते सगळे
काना आणि मात्रा नि अर्थ होतात वेगळे
क ख ग ची होते बाराखाडी
जरा चूक झाली कि हाता वर छडी
गर्व तर होता, आहेच कि राव
पण वेळ अशी आहे, पाठी पडला डाव
आई ची मॉम झाली अन बाबा झाला डॅड
बाकी सगळे म्हणतात म्हणून आम्हाला पण फॅड
भाषे चा माज, तर हि कसली लाज
शाळा नाही मराठी, इंग्लिश पाहिजे आज
काळाची गरज असेल, तुम्ही लागेल ते शिकवा
पण मराठी चा गर्व आणि मान तेवढा टिकवा
मराठी चा गर्व आणि मान तेवढा टिकवा
मराठी चा गर्व आणि मान तेवढा टिकवा

Listen to the poem as a song:
Feel free to share:
© Bakul Raut
Comments
Share Your ThoughtsBe the first to write a comment.
00:00 / 02:00
bottom of page