top of page

© Bakul Raut

गणपतीचा जयजयकार
ढोल ताशा, गाजा बाजा
बाप्पा म्हणतो, नको तमाशा.
दिव्य भव्य, देख देखावे
एवढे मोठे तरी का हवे.
बाप्पा नाचत गाजत सांभाळून यावा
पण कधी मूर्ती चा तोल ना जावा.
अशी काही प्रथा नव्हती
अशी पूर्वी रीत नव्हती.
उत्साह आपला उंच असावा
पण उंची ची ही स्पर्धा नसावी.
त्याला फक्त तुमची भक्ती सरे
मोदकाचे दोन घास पण पुरे.
म्हणतात सगळे बाप्पा मोरया
त्याच्या इच्छेचा पण आदर करूया.
ढोल ताशा, गाजा बाजा
बाप्पा म्हणतो, नको तमाशा.

Listen to the poem as a song:
Feel free to share:
© Bakul Raut
Comments
Share Your ThoughtsBe the first to write a comment.
00:00 / 02:00
bottom of page